|

बिलासपूर (हिमाचल प्रदेश) – येथील तलाई पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका गावात ५ वर्षांच्या मुलीवर एका अल्पवयीन मुसलमान मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ६ मार्च या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुसलमान मुलाला कह्यात घेतले असून त्याला बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार सिमला येथील हिरानगर सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
१. मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली. ८ मार्च या दिवशी परिसरातील २०० लोक पीडितेच्या घरी पोचले. आंदोलकांमध्ये स्थानिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, भाजप मंडल अध्यक्ष, भाजपचे युवा कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते, व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी आणि भडोलिया, बकैन आणि कलोल येथील महिला यांचा समावेश होता. संतप्त जमावाने भडोली कला येथील एका धार्मिक स्थळात शिरून तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
२. आरोपीच्या घरासह जिल्ह्यातील धार्मिक आणि संवेदनशील स्थळांच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल येणे शेष आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. हिंदू रक्षा मंचाचे कमल गौतम यांनी कार्यकर्त्यांसह पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिका‘अल्पवयीन मुसलमान मुलगा हिंदु मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करतो, यावरून त्याला लहानपणापासून हिंदुद्वेष आणि लव्ह जिहाद यांचे बाळकडू देण्यात आले’, असे कुणी म्हटले, तर त्यात चूक काय ? |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक