|

मुंबई/रत्नागिरी – वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठलभक्ती यांची घोर विटंबना करणार्या ‘ईठ्ठला’ या नाटकाला राज्यभर विरोध झाल्यावर त्याचे सादरीकरण स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेत निर्मात्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. नाटकाच्या निर्मात्यांनी हे नाटक सद्य:स्थितीत थांबवण्याचा आणि नाव, कथानक आणि पात्रे यांच्या नावांत पालट करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात दिला आहे.

१. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ‘६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धे’च्या अंतिम फेरीत जयप्रकाश पाखरे, वीरशैव समाज, लांजा निर्मित, अमोल रेडीज लिखित आणि अमोल रंगयात्री यांनी दिग्दर्शन केलेले ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते.
२. नाटक पाहिल्यानंतर वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक अन् कार्यकर्ते संतापले. नाटकात वारकरी भक्तांना ‘हत्यारे’ म्हणून दाखवून संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता.
३. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच समितीचे सर्वश्री सतीश सोनार आणि रवी नलावडे यांनी मुंबईत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.
४. या वेळी सामंत यांनी तात्काळ नाटकाच्या निर्मात्यांना भ्रमणभाषवरून संपर्क साधला आणि संतांच्या नावाने चाललेला हा अनाचार थांबवण्याचे आदेश दिले. ‘नाटकाच्या नावात पालट करा. पात्रांना दिलेली संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणारी संकल्पनाही त्वरित पालटा’, अशा कठोर सूचना मंत्र्यांनी दिल्या.
५. मंत्र्यांच्या भूमिकेनंतर नाटक निर्माते ‘वीरशैव समाज, लांजा’ यांनी हिंदु जनजागृती समितीला दिलेल्या लेखी पत्रात म्हटले, ‘‘वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांनी घेतलेल्या आक्षेपांचा आदर राखून आम्ही हे नाटक थांबवत आहोत. आक्षेपार्ह प्रसंग आणि नावे यांच्यात आवश्यक पालट करूनच पुढील सादरीकरण केले जाईल.’’
‘ईठ्ठला’ या नाटकाचे शीर्षक, आक्षेपार्ह संवाद व पात्रांची नावे बदलण्याचे नाटकाच्या निर्मात्यांचे लेखी आश्वासन
श्रद्धास्थानांची विटंबना कदापि खपवून घेतली जाणार नाही !‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या श्रद्धास्थानांची विटंबना कदापि खपवून घेतली जाणार नाही’, असे भूमिका हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे मांडली. मंत्री सामंत यांनी वारकर्यांच्या भावना समजून घेऊन तातडीने केलेल्या कारवाईसाठी समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. |
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !
नाटकातील संतापजनक नि आक्षेपार्ह भाग !१. विठ्ठलाचे नाव घेणारे दांपत्य १० निष्पाप पाहुण्यांची हत्या करते, असे दाखवून वारकरी भक्तांना गुन्हेगार ठरवण्यात आले. २. नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून हत्या होतांना दाखवले. प्रत्यक्षात हा वारकरी संतांचा मोठा अपमान आहे. ३. आई (जना) ही विठ्ठलनामात मग्न होऊन आपल्याच मुलाची (नामाची) हत्या करते, असे अमानवीय दृश्य दाखवून समाजाची दिशाभूल करण्यात आली. |
संपादकीय भूमिका
|
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली