भगवंताचे भजन आणि ध्यान विनामूल्य असून तो मानवाचा अधिकार असणे अन् ते करणार्‍याला दैवी संपत्ती मिळणे

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

भगवंताचे भजन, प्रार्थना, स्मरण, चिंतन आणि ध्यान करायला काय व्यय होते ? भगवंताच्या चिंतनापेक्षा अधिक विनामूल्य, विनामोलाची कोणतीच गोष्ट नाही. भगवंताचे भजन आणि ध्यान करण्याचा मानवाचा अधिकार आहे. भगवंताने माणूस भजनाकरताच निर्मिला आहे. भजन हा आमचा स्वभाव आहे. ध्यान, प्रार्थना, भजन, स्मरण, चिंतन, जप आणि अर्चन असे कोणतेही त्याला नाव द्या. जन्मतःच प्रत्येकाची क्षमता, अधिकार आणि स्वभाव असतो. तो भगवंताचे भजन, स्मरण, स्तवन, जप, अर्चन, ध्यान असे काहीतरी करतोच. कुठूनही, कशाही प्रकारे भगवंताशी जोडले जाणार्‍यांचे अंतःकरण कणाकणाने, क्षणाक्षणाने निर्मळ होत जाते, तसा तो दैवी संपत्तीचा स्वामी होतो. भगवंताशी जो जोडला जातो, त्याला दैवी संपत्ती मिळवावी लागत नाही. साधूकडे ती आपोआपच येते. भगवंतात सगळी दैवी संपत्ती सामावली आहे. जिथे तो पोचतो, त्याला तिचा सुवास चिकटतोच !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)