|

मुंबई – ज्यांच्या घरी मृत्यू झाला आहे, त्यांच्याविषयी आम्ही शोक व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत; मात्र प्रत्येक देशाचे वाद त्या त्या देशातच राहिले पाहिजेत. इतर ठिकाणी ते वाद आणू नयेत. इराणने त्याचा वाद इराणमध्ये ठेवावा. अमेरिकेने तिचा वाद अमेरिकेत ठेवावा. आज जगभर जी आंदोलने होत आहेत, त्याचा आम्ही कठोर निषेध करतो, मग ती आंदोलने भारतात होत असोत किंवा पाकिस्तानमध्ये. याचे कारण मृत झालेले आमचे मार्गदर्शक नाहीत. ते आमचे प्रमुख नाहीत. संपूर्ण जगातील शिया समुदाय इराकमधील अयातुल्ला सिस्तानी यांना मानतो. इराणमधील कोणत्याही मौलवीला आम्ही मानत नाही, अशी भूमिका ‘ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डा’चे उपाध्यक्ष मौलाना हसन अली रजनी यांनी व्यक्त केली आहे.
पैसे देऊन आंदोलने घडवली जात असल्याचा आरोप
मौलाना रजनी यांनी पुढे गंभीर विधान केले. त्यांनी सांगितले की, काही लोक राजकीय पद्धतीने येथे पैसे देतात आणि संपूर्ण जगात आंदोलने घडवून वातावरण बिघडवतात. अलीकडे आमच्या काही लोकांनी पाकिस्तानमधील अमेरिकी दूतावासावर आक्रमण केले आणि त्यानंतर झालेल्या प्रत्युत्तर कारवाईत ३५ शिया ठार झाले. बांगलादेशामध्येही मृत्यू झाले, कतारमध्ये मुसलमान ठार झाले. संपूर्ण जगात मुसलमान बळी पडत आहेत. आम्ही त्यांना एवढीच विनंती करतो की, स्वतःच्या देशाप्रती निष्ठावंत रहा. या गोष्टी आपल्या देशापुरत्याच मर्यादित ठेवा.
जगभरात २ कोटी मुसलमान ठार झाले; पण भारतातून कोणताही मुसलमान बोलत नाही !
मौलाना रजनी यांनी पुढे सांगितले की, ४० वर्षांत २ कोटींपेक्षा अधिक मुसलमान ठार झाले आहेत; मात्र भारतातील कोणताही मुसलमान त्याविषयी बोलत नाही; परंतु भारतात एखादा मुसलमान मृत्यूमुखी पडला, तर जगातील सर्व वृत्तवाहिन्या दाखवतात की, भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव किंवा छायाचित्र दुसर्या देशात घेऊ शकत नाही; मात्र आपल्या देशात परदेशातील नेत्यांची छायाचित्रे ठेवली जातात, त्यांचे झेंडेही फडकवले जातात आणि त्यांच्या मृत्यूवर लोक आंदोलन करतात.
मोहरमच्या मिरवणुकीत खामेनी यांचे छायाचित्र ठेवू नये !
मौलाना रजनी यांनी स्पष्ट केले की, खामेनी यांच्या समर्थनार्थ आंदोलने होऊ नयेत. मोहरमच्या मिरवणुकीत जर खामेनी यांचे छायाचित्र ठेवले गेले, तर आम्हीही नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र ठेवू, त्यासाठी आम्हाला कारागृहात टाकले तरी चालेल. आपण आपल्या पंतप्रधानांचे नाव घेतले, तर आम्हाला ‘आतंकवादी’ म्हटले जाते; पण हे लोक दुसर्या देशातील नेत्यांची नावे आणि छायाचित्रे घेऊन आंदोलन करतात, दूतावासांवर आक्रमणे करतात, तर ते ‘आतंकवादी’ ठरत नाहीत का ? आम्ही याचा कठोर विरोध करतो. जगभर अशी आंदोलने होऊ नयेत. तसेच जगातील सर्व शिया इराणच्या बाजूने नाहीत; केवळ काही लोक त्यांच्यासमवेत आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal