
जो हीन, कुत्सित वासनांतून मुक्त आहे. ज्याला मनोविकार स्पर्शत नाहीत, ज्याला भीतीचा संसर्ग नाही, जो वासना, विचार, मनोवेग, मनोभाव, शरीर आणि मन जिंकतो, तोच खरा स्वतंत्र. बाकी सगळे गुलाम आणि दास ! इर्षा, द्वेष, घृणा, भय आणि अहंकार आहे, तिथे कसली स्वतंत्रता ? जो विकारांच्या वर आहे, सुख-दुःख आले किंवा गेले, जो अलग, अलिप्त आणि साक्षी आहे, तोच सुख-दुःख अन् द्वंद्वाच्या पलीकडे असतो. जो शांत आणि सुखी असतो, तोच स्वतंत्र ! बाह्य विकार वा स्पर्शाने जो विचलित होत नाही, तोच पुरुष. मनुष्याने स्वतंत्र व्हावे, त्याला आनंद प्राप्त व्हावा, शांती मिळावी; म्हणून भगवान क्षेत्रज्ञाचे रहस्य उलगडून दाखवतात. क्षेत्रज्ञ (शरीर जाणणारा) आणि आत्मा यांच्या साक्षात्काराविना स्वातंत्र्य, शांती, निर्भयता अन् अमृतत्व नाही.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !