युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील ९९ टक्के पर्यटकांनी केली तिकिटे रहित !

पर्यटन व्यवसायाला मोठा फटका !

मुंबई – इस्रायल-इराण-अमेरिका या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातील देशांनी आखाती देशांतील उड्डाणे थांबवली आहेत. विदेशात फिरायला जाणार्‍यांपैकी महाराष्ट्रातूनच ९९ टक्के पर्यटकांनी तिकिटे रहित केली आहेत. त्यामुळे त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, अशी माहिती ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे संचालक विश्‍वजीत पाटील यांनी दिली.

मक्का यात्रेसाठी गेलेले नाशिकचे २०० भाविक अडकले आहेत. दुबईत जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक अडकले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह ४० ज्येष्ठ नागरिक दुबईत आहेत. न्यू दुबई भागातील वसतीगृहात लातूर, धाराशिव, नाशिक आणि पुणे येथील ३० विद्यार्थी अडकले आहेत.