महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन
|
श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, मुंबई.

मुंबई – राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली असून सामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मागील ६ वर्षांत राज्यात ३० लाखांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यातच वर्ष २०२४ मध्ये केवळ मुंबईत १ लाख २८ सहस्र नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. राज्यात प्रतिदिन सरासरी १ सहस्र ३६९ नागरिक कुत्र्यांच्या आक्रमणात मृत्यूमुखी ठरत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत नगरविकास विभागाने तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
🚨 Stray Dog Menace in Maharashtra 🐕
Over 30 lakh citizens bitten in 6 years across the State!
In Mumbai alone, 1.28 lakh dog-bite cases in a single year.
That means an average of 1,369 people bitten every single day
Assurances were given in the Legislative Council… but is… pic.twitter.com/XAhGS6716b
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2026
राज्यातील विशेषतः मुंबई आणि नागपूर शहरांतील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याविषयी विधान परिषदेत सदस्य कृपाल तुमाने, डॉ. (श्रीमती) मनीषा कायंदे, हेमंत पाटील, योगेश टिळेकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अधिवक्ता निरंजन डावखरे, डॉ. परिणय फुके, विक्रांत पाटील, सदाशिव खोत आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथे २७ सहस्र ४६६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. दिवा (जिल्हा ठाणे) येथील ६ वर्षीय कु. निशा शिंदे हिचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजच्या संसर्गाने दुर्दैवी मृत्यू झाला होता.
प्रशासनाकडून उपाययोजना !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले आणि रेल्वे स्थानके यांसारख्या संवेदनशील ठिकाणांजवळ भटक्या कुत्र्यांसाठी निवारे (शेल्टर) उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी ३ जागा निश्चित केल्या असून अन्य १७ जागांचा शोध घेतला जात आहे. कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी नसबंदी मोहिमेला गती देण्यात येत आहे. रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासू नये, यासाठी आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
संपादकीय भूमिका
|
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !