इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ‘त्यांनी केलेल्या कृतींवर समाजात काय पडसाद उमटतात ?’ याचा अंदाज घेत आहेत. महिलांच्या आडून हिंदु पुरुषांना ‘लक्ष्य’ केले जात आहे. महापुरुष आणि त्यांच्या विचारांचा अवमान कोण करत असेल, तर त्याला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता ठेवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. ते हिंदु जनआक्रोश मोर्चाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.
कबनूरमध्ये धर्मांध महिलेने महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करणे, पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्यावेत, महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात शासनाने कडक कायदा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदु समाजाने हिंदु जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. (यासाठी मोर्चा का काढावा लागतो ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक) प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. विविध मार्गांवरून जाऊन मोर्चा महात्मा गांधी पुतळा चौकात पोचल्यावर सभेत रूपांतर झाले.

भविष्यात महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही ! – राहुल आवाडे, आमदार, भाजप
जिहादी महिलेने महापुरुषांची विटंबना केल्याने आंदोलन झाले आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवरच गुन्हे का ? देश, राष्ट्र आणि जनतेच्या संरक्षणासाठी शासन कटीबद्ध असून भविष्यात महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजन(गुरुजी) यांनी ‘भारतीय संस्कृती जगाला वंदनीय असून ती कायम ठेवली पाहिजे, यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.’ मोर्चात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट सहभागी झाले होते.
समारोपाच्या प्रसंगी अपर तहसीलदार महेश खिलारी आणि पोलीस प्रशासन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात शहर परिसरातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोर्चामध्ये १ मार्च या दिवशी हुपरी (कोल्हापूर) येथे होत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले.
संपादकीय भूमिकामहापुरुषांचा अवमान करणार्यांना कडक शिक्षा होत नसल्यानेच तसे करणार्यांचे फावत आहे ! |
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !