हिंदूंच्या कत्तली करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान !

‘क्रूरकर्मा टिपूने कर्नाटकात धिंगाणा घातला. सहस्रावधी हिंदूंना रक्तस्नान घातले. सहस्रो स्त्रियांवर विहिरीत उड्या घेण्याचे प्रसंग आले. नरगुंद आणि कित्तूर या संस्थानांमध्ये टिपूने अक्षरशः नंगानाच घातला. सहस्रो स्त्रियांवर अत्याचार करविले. अमर्याद प्रमाणात जाळपोळ आणि विध्वंस केला.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

याचा प्रतिशोध घेण्यासाठी मराठ्यांच्या बलदंड सेनांनी सरदार पटवर्धन, फडके, बेहरे, होळकर, भोसले यांच्या नेतृत्वाखाली टिपूच्या सैन्याला झोडपीत झोडपीत सारा कर्नाटक मुक्त केला. मुसलमानी सैन्याचा प्रचंड संहार केला. त्याच वेळी इंग्रजांनीसुद्धा टिपूवर हल्ले चढवले. भयग्रस्त झालेल्या हिंदुद्वेष्ट्या टिपूने नंतर हिंदु देवीदेवतांची भक्ती करायला प्रारंभ केला. देवस्थानांना देणग्या दिल्या. अनुष्ठाने केली. शंकराचार्यांचा सत्कार केला. तरीही अखेर टिपूचे सारे राज्य मराठ्यांनी जिंकले आणि टिपू मारला गेला.’

– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.       ॐ

(साभार : ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथामधून)