राजस्थानमध्ये ३ शहरांचे नामांतर

जयपूर (राजस्थान) – राजस्थान शासनाने ३ शहरांची नावे पालटण्याची घोषणा केली आहे. यात माऊंट आबूचे आबूराज, जहाजपूरचे यज्ञपूर आणि कामां शहराचे नाव कामवन असे नामांतर करण्यात आले आहे. ही घोषणा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी केली.
Rajasthan moves to reclaim its civilisational roots and preserving cultural heritage
Mount Abu ➡️ Aburaj
Jahazpur ➡️ Yagyapur
Kaman ➡️ Kamvan3 historic destinations to be renamed – CM Bhajan Lal Sharma
But a larger question arises – instead of changing names one by one, why… pic.twitter.com/1RZ6LltKiZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2026
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, स्थानिक नागरिकांची मागणी, ऐतिहासिक संदर्भ आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसारित करून नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
काँग्रेसचा विरोध
राजस्थान काँग्रेसचे सरचिटणीस स्वर्णिम चतुर्वेदी यांनी आरोप करतांना म्हटले की, नावे पालटण्यापेक्षा या शहरांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांना बळकटी देणे अधिक आवश्यक आहे. शासन खर्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी असे निर्णय घेत आहे. (अत्याचारी मुसलमान आणि इंग्रज यांनी दिलेली नावे पालटून भारतीय संस्कृतीनुसार करणे हे स्वातंत्र्यानंतरच आवश्यक होते; मात्र मोगल आणि इंग्रज यांची वैचारिक गुलामगिरी करणार्या काँग्रेसला ते करायचे नव्हते आणि आता कुणी करत आहे, तर काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. अशा काँग्रेसपासून भारताला मुक्त करणे अत्यंत आवश्यक झाले आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे एकेक नामांतर करण्याऐवजी देशपातळीवर एकाच आदेशात सर्व नावे पालटण्याचा आदेश का काढला जात नाही ? |
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati