|

मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘यादव जी की लव स्टोरी’ या चित्रपटाच्या शीर्षकात ‘यादव’ या जातीचा उल्लेख करून यादव समुदायाचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये हिंदु समाजाच्या संस्कृतीचे चुकीचे चित्रण केले आहे. यामुळे जातीय द्वेष निर्माण होऊन सामाजिक सौहार्द बिघडण्याचा धोका आहे. चित्रपटाच्या कथेतील हिंदु युवती आणि मुसलमान युवक यांची प्रेमकथा चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे. त्यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रपटाला विरोध केला.
ते म्हणाले,…
१. चित्रपटाविषयी समाजातून तीव्र आणि संतापजनक भावना व्यक्त होत आहेत. यामुळे प्रशासनाने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा आणि चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक अन् कलाकार यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
२. चित्रपटाच्या विरोधात आम्ही पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे, तसेच राज्यशासनाला पत्र पाठवले आहे.
३. ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळा’च्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) कार्यालयावर करणी सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !