‘देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सादर करायच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणासंबंधी प्रात्यक्षिके बसवणे आणि त्याचे नियोजन करणे’ यांसंदर्भात सेवा करतांना साधकांना श्री. अभिजित भोजने यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा साधकांच्या लक्षात आलेली श्री. अभिजित भोजने यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. हेमंत पुजारे, विरार, मुंबई
१ अ. प्रशिक्षण प्रकारांमधील कौशल्य : ‘अभिजितदादा कराटे, दंड, साखळी यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या प्रकारांतील अनेक पैलू शिकले आहेत. या प्रकारांमध्ये दादाची परिपूर्णता वेगळ्याच स्तराची आहे. दादा गांभीर्याने आणि गुरुदेवांना अपेक्षित असा साधकांचा सराव करून घेत असत.
१ आ. इतरांचा विचार करणे आणि प्रेमाने सेवा करून घेणे
१. प्रशिक्षक साधकांचा सराव घेत असतांना पुष्कळ वेळा प्रकार करण्यात पालट होत होते. तेव्हा दादा प्रशिक्षक
साधकांना सहजतेने आणि कुणालाही ताण येणार नाही, अशा पद्धतीने सांगून सराव करून घेत असत. दादा नवीन सूत्रे सर्वांना समजावून सांगत असत.

२. दादा त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या साधकांनी केलेल्या चुका त्यांना प्रेमाने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून सांगत असत. दादा त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या साधकांना कुणाचेही मन न दुखावता स्पष्टपणे सूत्र सांगत असत. दादांच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेले निर्णय, त्यांचे बोलणे आणि चुका सांगणे, हे साधक सहजतेने स्वीकारत होते.
१ इ. साधकांशी जवळीक साधणे : दादाचे नेतृत्व प्रशिक्षक साधकांनी स्वतःहून स्वीकारले होते. प्रशिक्षणाचा सराव करतांना किंवा दादाच्या समवेत कोणतीही सेवा करतांना दादांनी सेवा सांगावी आणि आम्ही ती सहजतेने स्वीकारावी, अशीच स्थिती होती.
१ ई. स्थिर आणि स्वीकारण्याची वृत्ती
१. साधक सराव करत असतांना काही अडचण आली किंवा एखाद्या प्रकारातील काही भाग साधकांना जमत नसेल, तरीही दादा कधीही अस्थिर झालेले मी पाहिले नाही.
२. कोणताही निर्णय पालटला किंवा काही नवीन करण्यास सांगितले, तरीही दादा ते सहजतेने स्वीकारून तसे करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करत होते.
१ उ. गुरुसेवेची तळमळ
१ उ १. दायित्व घेऊन अल्प कालावधीत सेवा पूर्ण करणे : प्रात्यक्षिके करण्यासाठी नवीन २५ दंड साखळ्या आणि ६ ‘डिफेन्स शिल्ड’ (पंचींग बॅग) हव्या होत्या. आम्हाला देहली येथे सेवेला जाण्यासाठी ५ दिवसच शेष होते. दादांनी एवढ्या अल्प कालावधीतही दायित्व घेऊन ती सेवा पूर्ण केली. दादांनी स्वतःचे वैयक्तिक काम सांभाळून या सेवा पूर्ण केल्या.
१ उ २. ‘गुरूंचे सर्व कार्य स्वतःचे आहे’, असा भाव असणे : देहलीला जातांना आम्हाला ‘पनवेल येथून साहित्याचे खोके घेऊन जायचे आहेत’, असे समजले. आम्ही ४ साधकच प्रवास करणार होतो. तेव्हा अभिजितदादा म्हणाले, “अरे वा ! चांगले आहे. आपण साहित्य नेऊ शकू.’’ ‘गुरूंचे सर्व कार्य माझेच आहे’, या भावाने त्याकडे पहायला हवे’, हे मला शिकता आले.’
२. श्री. अर्जुन पुजारे, रायगड

२ अ. अभ्यासू वृत्ती आणि गुरुधनाप्रती भाव : पंचींग बॅग बनवतांना ‘फोम’ लागणार होता. दुकानदाराकडून खरेदी करतांना दादांनी ‘आवश्यक तेवढाच ‘फोम’ खरेदी कसा करता येईल ?’, याचा अभ्यास केला. त्या वेळी दुकानदार ‘पूर्ण शीट घेऊन जा’, असे सांगत होता. तेव्हा अभिजीतदादांनी दुकानदाराला ‘हे दैवी कार्य आहे’, असे सांगून आवश्यक तेवढाच ‘फोम’ खरेदी केला. तेव्हा मला ‘व्यावहारिक अनुभवाचा उपयोग गुरुकार्यासाठी कसा करायला हवा ? गुरुधनाचा काटकसरीने कसा उपयोग करायचा ?’, हे शिकता आले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.१२.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !