मुलीच्या मोठ्या भावाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता

राजस्थान – नागौरमधील एका खासगी शाळेत ९ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ती खेळत असतांना खाली पडली पडल्यावर शाळेतील कर्मचार्यांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ४ महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या भावाचाही अशाच प्रकारे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
१. ही घटना नागौर जिल्ह्यातील गोटन शहरातील ‘गोटन इंटरनॅशनल स्कूल’मध्ये २३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी घडली. शाळेचे संचालक रामकुंवार ओला यांनी सांगितले की, तालणपूर येथील राजेंद्र बापेडीया यांची मुलगी दिव्या ही इयत्ता पाचवीत शिकत होती. नेहमीप्रमाणे शाळा चालू होण्यापूर्वी ती अन्य मुलांसह मैदानात खेळत होती. खेळता खेळता अचानक दिव्या बेशुद्ध होऊन खाली पडली.
२. शाळेच्या कर्मचार्यांनी कुटुंबियांना माहिती देण्यासह दिव्याला गोटन येथील शासकीय रुग्णालयात नेले; परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या मते, दिव्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमेच्या खुणा नव्हत्या. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे मानले गेले आहे.
३. दिव्याचा मोठ्या भाऊ अभिषेक याचाही मृत्यू अशाच प्रकारे झाला होता. ९ सप्टेंबर २०२५ या दिवशी घरी खेळत असतांना तो अचानक बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले होते.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !