|

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा. राज्य सरकारच्या संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. प्रसाद लाड यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत केली.
या मागणीवर संसदीय कार्यमंत्री श्री. चंद्रकांत पाटील सकारात्मक प्रतिसाद देत म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत हा प्रस्ताव मांडतो. त्यानंतर सभापती महोदयांनी त्यावर निर्णय घ्यावा.’’
हिंदुत्वनिष्ठ सरकारकडून जनतेला अपेक्षा !
गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहेेे; मात्र तरीही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटना खंत व्यक्त करत आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ पदवीसाठी नव्हे, तर या देशाच्या अस्मितेसाठी जगले. त्यांना ‘भारतरत्न’ मिळणे हा सावरकर यांचा नव्हे, तर त्या पुरस्काराचाच खर्या अर्थाने सन्मान ठरेल. राज्य सरकारने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करून ठराव लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवावा, हीच देशप्रेमी नागरिकांची इच्छा आहे ! |
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न