आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप

मॉस्को (रशिया) – आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली ‘टेलीग्राम’ ॲपचे संस्थापक पावेल डुरोव यांच्या विरोधात रशियाने गुन्हा नोंदवला आहे. रशियाची सुरक्षायंत्रणा ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने दिलेल्या माहितीनंतर अन्वेषण चालू करण्यात आले आहे. पावेल डुरोव सध्या दुबईमध्ये वास्तव्यास असून टेलीग्रामचे मुख्यालयही दुबईतच आहे. त्यामुळे रशियाच्या या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टेलीग्रामने आरोप फेटाळले
‘टेलीग्राम’ गुन्हेगारी कारवायांचे केंद्र असल्याचे किंवा त्यावर पाश्चिमात्य आणि युक्रेनच्या गुप्तचर संस्थांचा प्रभाव असल्याचे आरोप टेलिग्राम आस्थापनाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. टेलीग्रामचा दावा आहे की, जगभरात त्यांच्या ॲपचे एक अब्जांहून अधिक सक्रीय वापरकर्ते (युजर्स) आहेत आणि आस्थापन युजर्सची गोपनीयता अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचे संरक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !