राष्ट्रीय गीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ !

मुंबई, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्राच्या विधीमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर घुमले. २३ फेब्रुवारी या दिवशी ६ कडव्यांच्या आणि ३ मिनिटे १० सेकंदांचे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. ‘वन्दे मातरम्’ गीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हटले गेले. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीही प्रथम ‘वन्दे मातरम्’, त्यानंतर ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.
‘वन्दे मातरम्’ गीताचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान लक्षात घेऊन या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाने सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. यासह ‘जन-गण-मन’ पूर्वी ‘वन्दे मातरम्’ गीत म्हणण्याचा नवीन नियम लागू केला आहे, तसेच ‘वन्दे मातरम्’ गीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रथमच या नियमाची कार्यवाही झाली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !