विरोधी पक्षाकडून सभागृह चालवण्यात सहकार्य न करण्याची घोषणा
थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरातील सोने बेपत्ता प्रकरण आणि पुरोहित कंदरारू राजीवारू यांच्या अटकेच्या सूत्रावरून केरळ विधानसभेत २३ फेब्रुवारीला तीव्र संघर्ष झाला. सभागृहाचे कामकाज चालू होताच सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी आणि विरोधी संयुक्त लोकशाही आघाडी आमनेसामने आले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने स्पष्ट केले की, सरकारने घेतलेल्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी ते सभागृहाच्या कामकाजात सहकार्य करणार नाहीत.
🔥 Uproar in the Kerala Assembly over the Sabarimala Temple gold theft case
Opposition announces non-cooperation in House proceedings and demands the resignation of Minister V. N. Vasavan, alleging the state government failed to ensure a proper and transparent investigation.… https://t.co/W0o6LAuyFx pic.twitter.com/4KM7dkqPgR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 23, 2026
१. प्रश्नोत्तराचा तास प्रारंभ होताच संयुक्त लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी अध्यक्षांकडे आक्षेप नोंदवला. देवस्वम् मंत्री व्ही.एन्. वसवन् यांच्या त्यागपत्राची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली आणि फलक दाखवण्यात आले. विरोधी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर धरणे देऊन बसले.
२. विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन् यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ आमदार के. बाबू यांनी सरकारवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, पुरोहित राजीवारू यांना ठोस पुराव्यांविना अटक करून ४० दिवस कारागृहात ठेवण्यात आले. शबरीमलात महिलांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेला समर्थन न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ग्लोबल अयप्पा संगमम् कार्यक्रमात कथित अनियमितता झाल्याचेही त्यांनी म्हटले.
३. कायदामंत्री पी. राजीव आणि संसदीय कार्य मंत्री एम्.बी. राजेश यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष अन्वेषण पथक चौकशी करत असून अहवाल सीलबंद पाकिटात न्यायालयाला सादर केला जात असल्याचे राजीव यांनी सांगितले. सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !