चाकण (पुणे) येथील ऐतिहासिक भुईकोट संग्रामदुर्गाला अतिक्रमणाचा विळखा !

  • दुर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याची स्थानिक हिंदूंची मागणी

  • पुरातत्व विभागाकडून डागडुजीचे काम चालू असतांना तो अतिक्रमण काढत नसल्याचा होत आहे आरोप

भुईकोट संग्रामदुर्ग

चाकण (पुणे) – जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथील भुईकोट संग्रामदुर्गाला ऐतिहासिक महत्त्व आहे. सध्या दुर्गाच्या डागडुजीचे काम चालू असतांना खंदक गाडले गेलेले दिसतात. अनधिकृत बांधकामांमुळे दुर्गाला धोका निर्माण होत आहे. दुर्गाच्या तटबंदीवर, तसेच बुरुजावर झाडे-झुडपे वाढली आहेत. पुरातत्व विभागाने या दुर्गाच्या परिसराची मोजणी करून दुर्गाचे क्षेत्र संरक्षित करावे. अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमी करत आहेत. पुरातत्व विभाग अतिक्रमण काढत नसल्याचा आरोपही होत आहे.

१. या दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी वास्तव्य केले होते.

२. गेल्या काही वर्षांत दुर्गाच्या परिसरात कचरा टाकणे, खंदक बुजवणे, दगडांची तोडफोड करून दगडांची, तसेच पांढर्‍या मातीची चोरी होणे असे प्रकार घडत आहेत.

३. पुरातत्व विभागाने दुर्गाच्या मध्यवर्ती भागांतून जाणारा रस्ता बंद केला आहे. आतील भागातील आणि परिसरातील अतिक्रमण काढण्याची निर्णायक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

४. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिवक्ता किरण झिंजुरके म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या या दुर्गाचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे. यासाठी सध्या ३० कोटी रुपयांची विकासकामे चालू आहेत.’’

पुरातत्व विभागाची भूमिका !

पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहणे म्हणाले की, दुर्गाच्या मध्यभागातून जाणार्‍या रस्त्याच्या खाली काही वाडे आहेत. त्यांचे उत्खनन होणार आहे. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, दुर्गाचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम होणार आहे. या दुर्गाचा विकास आराखडा सिद्ध करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभागाला स्वत:हून ते लक्षात येत नाही का ?
  • पुरातत्व विभागाने तत्पर होऊन दुर्गाच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदूंनी सातत्याने जागरूक रहाणे आवश्यक आहे ! आता डागडुजीचे काम चालू असतांना अशा मागण्या होणे आवश्यक असले, तरी धर्मप्रेमी हिंदूंनी अखंड सावधान रहाणे, हे अधिक आवश्यक आहे !
  • हिंदूंमधील धर्माभिमान आणि हिंदूसंघटन यांच्या अभावामुळेच पुरातत्व विभाग अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करत नसेल, हे कशावरून ? अतिक्रमणाच्या रेघेसमोर हिंदूऐक्याची मोठी रेघ ओढली, तर पुरातत्व विभागही सुतासारखा सरळ होऊन हिंदूंच्या मागण्या न विचारता पूर्ण करेल, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !