समाजाने देव आणि धर्म न मानणे, ही देशातील सरकारने निर्माण केलेली वृत्ती !

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

‘जे विचार घरात, तेच सार्वजनिक ठिकाणी असले पाहिजेत. अमेरिकेतील ४०० विद्यापिठांमध्ये भारतातील वेदांचा अभ्यास केला जात आहे. काही दिवसांनी अमेरिकेतील मंडळी सोवळे घालून फिरतील, तर आपल्याकडील मंडळी सार्वजनिक ठिकाणी ‘पार्ट्या’ (मेजवान्या) करतील. ‘आम्ही देव मानत नाही, धर्म मानत नाही’, ही सर्व वृत्ती या देशातील सरकारने केलेली आहे. वर्ष १९४७ मध्ये या देशाचे तुकडे झाले, जो काही आमचा भाग होता, तो तोडला गेला, अनेकांवर अत्याचार झाले. त्या वेळी हिंदू संकटात सापडले. तेव्हाचे २ कोटी ५० लाख आता २५ कोटी झाले. लोकशाहीमध्ये मते आणि बहुमत यांना महत्त्व असेल, तर डोळ्यांवर चामडे ओढून बसणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. ही स्थिती अशीच चालू राहिली, तर पुढे रहाणेही अशक्य होईल.’

– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.