
अहिल्यानगर – येथे एका १५ वर्षाच्या मुलीचे ३ आरोपींनी अपहरण केले आणि जवळच्या जंगलात नेऊन ५ दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही मुलगी महाविद्यालयात जातांना तिचे अपहरण करण्यात आले होते. या ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. मुलगी महाविद्यालयातून घरी न आल्यामुळे पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
अल्पवयीन मुलींना लक्ष्य केले जात आहे ! – संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलींना लक्ष्य करण्याच्या घटना वाढत आहेत. या प्रकरणी आरोपींवर योग्य प्रकारे कारवाई होत नाही. पोलीस या गुन्हेगारांना पाठीशी घालतात का ? असा माझा प्रश्न आहे.
हिंदु मुलींना लव्ह जिहादद्वारे जाळ्यात ओढण्याचा प्रकार ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्यात येते. येथे राजकारण करत नसून जे वास्तव आहे, ते मांडत आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
संपादकीय भूमिकाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात तरुणींचे अपहरण आणि त्यांच्यावर बलात्कार होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांचा धाक संपल्याने या घटना वाढत आहेत. मुली आणि महिला यांना सुरक्षित वातावरण केव्हा मिळणार ? |
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !