
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाजवादी पक्षाचे आमदार कमाल अख्तर यांनी रमझानच्या काळात मशिदींमधून ध्वनीक्षेपकाद्वारे सहरी (रमझानच्या मासात पहाटे रोजा (उपवास) प्रारंभ करण्यापूर्वीचा आहार) आणि इफ्तार (मुसलमानांचे रमझानच्या काळात सायंकाळी उपवास सोडणे) यांच्या घोषणांचे सूत्र उपस्थित केले. राज्यात होळी, दिवाळी, दसरा, कावड यात्रा, तसेच ख्रिस्ती आणि शीख समाजाचे सण साजरे केले जातात. त्यामुळे रमझानच्या पवित्र महिन्यात मशिदींना ध्वनीक्षेपकाद्वारे घोषणा करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
UP Govt says NO to mosque loudspeakers during late-night Ramzan announcements, citing the Supreme Court ruling.
“Mobile phones show the time” – Minister @SureshKKhanna stresses public peace over noise pollution.
Should all BJP-ruled states implement the same policy?#UP… pic.twitter.com/b5Ngwxebed
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2026
यावर उत्तर देतांना अर्थ आणि संसदीय कार्यमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ‘रात्री १० नंतर पहाटे ६ पर्यंत ध्वनीक्षेपक वापरू नये’, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले.
घड्याळ नसलेल्या काळातील परंपरा आता कालबाह्य !
कार्यमंत्री खन्ना यांनी पुढे सांगितले की, सहरी आणि इफ्तार यांच्या वेळेविषयी मशिदींमधून घोषणा करण्याची परंपरा घड्याळे नसलेल्या काळातील आहे. पूर्वी लोक सूर्याच्या दिशेनुसार वेळेचा अंदाज घेत असत. आता प्रत्येक व्यक्तीकडे, मग तो रिक्शाचालक असो, हातगाडी चालक असो किंवा भाजी विक्रेता असो, भ्रमणभाष आहे आणि त्यात वेळ दिसते. त्यामुळे अशा घोषणांची आवश्यकता उरलेली नाही, असे त्यांनी म्हटले.
धार्मिक श्रद्धेत हस्तक्षेप नाही
सुरेश खन्ना यांनी सांगितले की, शासन कुणाच्याही धार्मिक श्रद्धेत हस्तक्षेप करत नाही; मात्र मोठ्या आवाजाच्या व्यवस्थेविषयी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू आहेत. हा शासनाचा नव्हे, तर न्यायालयाचा आदेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर कमाल अख्तर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आवाजाच्या तीव्रतेविषयी असून ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पूर्ण बंदी नसल्याचे नमूद केले. (खोटे बोला; पण रेटून बोला वृत्तीचे आमदार ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचा निर्णय प्रत्येक भाजपशासीत राज्यांनी घ्यावा, असेच हिंदूंना वाटते ! |
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध