
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील जोशीमठ येथे बांधकाम चालू असलेल्या नगरपालिका इमारतीत खेळाडूंसाठी एक सभागृह उभारले जात आहे. येथे नमाजपठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हिंदु संघटनांनी विरोध करत आंदोलन चालू केले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने प्रशासन तात्काळ सक्रीय झाले असून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
⚠️Tension in Joshimath, Uttarakhand
Hindu groups protest against Namaz being offered inside a government Municipal hall.
How is this audacity possible in a Government building under the BJP Govt?
Was the administration asleep? 👮♂️💤#JoshimathProtest
Video Source : X pic.twitter.com/OvQCdr7Gr6— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 20, 2026
१. ‘सरकारी इमारतीत इतक्या संख्येने मुसलमानांकडून नमाजपठण होत असतांना प्रशासन काय करत आहे, संबंधितांची पडताळणी करण्यात आली आहे का ?’, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
२. स्थानिक नागरिकांच्या मते, मागील काही काळापासून येथे नमाजपठण करण्यासाठी येणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले. १९ फेब्रुवारीला हिंदु संघटनांनी स्थानिकांसह या घटनेविरोधात आंदोलन केले आणि पोलीस ठाण्यात आक्षेप नोंदवला. या व्यक्तींना येथे नमाजपठण करण्यास अनुमती कुणी दिली ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपादकीय भूमिकाभाजप सरकारच्या काळात सरकारी इमारतीत नमाजपठण करण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? असे घडत असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत