प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ‘घरवापसी’च्या विधानावरून मौलाना अरशद मदनी यांचा जळफळाट !
(‘घरवापसी’ म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

नवी देहली – ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या ‘घरवापसी’च्या संदर्भातील विधानावर तीव्र टीका केली आहे. देशात सध्या द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असून हिंसाचाराला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ‘भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत. त्यांचीही ‘घरवापसी’ करायची आहे’, असे विधान डॉ. मोहनजी भागवत यांनी नुकतेच केले होते. (प.पू. सरसंघचालकांनी सत्य इतिहास मांडला आहे; परंतु बाटगे अधिक कडवे असतात. त्यामुळे असे विचार त्यांच्या पचनी पडत नाहीत, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक)
१. मौलाना अरशद मदनी यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, २० कोटी मुसलमानांच्या ‘घरवापसी’चे विचार मांडण्याचे धारिष्ट्य गेल्या ७० वर्षांत कुणी केले नव्हते, ते आज मांडले जात आहेत. कुठलीही हाक जी देशाला विनाश, अस्थिरता आणि परस्पर वैर यांकडे घेऊन जाते, ती देशनिष्ठेची हाक असू शकत नाही. (देशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणे (गतवैभव पुनर्स्थापित करणे) ही राष्ट्रनिष्ठाच आहे ! – संपादक)
२. देशात गायीच्या नावाखाली निरपराधांना ठार केले जात आहे आणि सरकार मौन बाळगून आहे, असा आरोप त्यांनी केला. (चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या यालाच ! गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना धर्मांध मुसलमानांकडून सर्रास गोहत्या केल्या जात आहेत. त्या रोखण्याचा प्रयत्न करणार्यांवर आक्रमणे केली जात आहेत. हे राज्यघटनेचे उल्लंघन नाही का ? – संपादक)
३. धर्माच्या नावावर कोणतीही हिंसा स्वीकारली जाऊ शकत नाही. सर्व धर्म मानवता, सहिष्णुता, प्रेम आणि एकतेचा संदेश देतात. (हिंदूंना ‘काफिर’ म्हणून त्यांना ठार मारण्याचा इतिहास असल्यांनी इतरांना मानवता, सहिष्णुता, प्रेम शिकवणे हात्स्यास्पद नव्हे का ? – संपादक) जे लोक धर्माचा वापर द्वेष आणि हिंसा पसरवण्यासाठी करतात ते आपल्या धर्माचे खरे अनुयायी ठरू शकत नाहीत, असे मदनी यांनी म्हटले.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !