गर्भगृहात भरलेली वाळू काढल्यानंतर वर्षभरात प्रवेश मिळणार
भुवनेश्वर (ओडिशा) – येथील प्राचीन कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात १ वर्षानंतर भाविकांना प्रवेश करता येणार आहे. सध्या गर्भगहामध्ये वाळू भरलेली आहे आणि ती काढण्याचे काम चालू आहे. मंदिराच्या मागे १५ फूट उंचीची भिंत आहे. ती कोसळू नये; म्हणून इंग्रजांनी वर्ष १९०३-०४ मध्ये मंदिराच्या गर्भगृहात सहस्रो टन वाळू भरली होती. तेव्हापासून गर्भगृह बंद आहे. आता भारतीय पुरातत्व विभाग आणि ‘आयआयटी मद्रास’ यांच्या तज्ञांच्या ३० लोकांच्या पथकाला ही वाळू काढण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
पूर्णपणे वाळू काढण्यासाठी ३ महिने लागतील. एक वर्षानंतर भाविकांना पहिल्यांदाच या ऐतिहासिक मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करता येईल.
या मंदिरात प्रतिवर्षी ३५ लाखांहून अधिक पर्यटक येतात. देशातील पुरातत्व स्मारकांमध्ये ताजमहाल नंतर हे मंदिर दुसर्या स्थानावर आहे.

‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !