नवी देहली – देश-विदेशात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात आला. भारतात ‘क्विक कॉमर्स’ या ऑनलाईन विक्री करणार्या ॲपवर या काळात तरुणांनी पूर्वीप्रमाणे फुले, चॉकलेट किंवा भेटवस्तू मागवल्या नाहीत, तर लैंगिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांची खुलेपणाने खरेदी केली. निरोधापासून अन्य साधनांपर्यंत विविध वस्तूंची मागणी झाली.
Reports show a massive surge in the sale of contraceptives and sexual products ahead of Valentine’s Day.
Is this "love" or just rising immorality?
It is time to consider a ban on such days that promote immorality under the garb of celebration. 🚫🇮🇳#SocialValues #ValentineDay… pic.twitter.com/LgZcJEFds9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2026
१. ‘इंस्टामार्ट’च्या अहवालात वर्ष २०२६ मध्ये भारतात लैंगिक आरोग्यविषयक उत्पादनांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत ३ पट वाढ झाल्याचे समोर आले. पूर्वी वर्ज्य मानल्या जाणार्या वस्तू आता ‘ऑनलाईन’द्वारे सर्वाधिक विक्री होणार्या ठरत आहेत.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने लैंगिक आरोग्य उत्पादनांच्या समेवतच सौंदर्य आणि स्व-देखभाल विभागातही मोठी विक्री झाली. ओडिशा येथील कटक येथील एका ग्राहकाने १५ सहस्र ९३ रुपयांचे मेकअप साहित्य खरेदी केले. गुजरातमधील सुरत येथील एका व्यक्तीने केसांची निगा, स्नान आणि शरीर निगा उत्पादनांवर १० सहस्र ८४५ रुपये खर्च केले.
३. व्हॅलेंटाईन डे कार्ड्सच्या विक्रीतही मोठी वाढ झाली. बेंगळुरू शहरामध्ये देहली, मुंबई, भाग्यनगर आणि चेन्नई यांच्यापेक्षा अधिक विक्री झाली.
संपादकीय भूमिकातथाकथित प्रेमाच्या दिवसाच्या नावाखाली स्वैराचार आणि अनैतिक कृत्य केली जात असल्याने भारतात अशा दिवसांवर आता बंदीच घालणे आवश्यक झाले आहे ! |

Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक