पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याप्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

पोलिसांच्या अनुमतीविना जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन !

पुणे – पोलिसांची अनुमती न घेता पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या एका संघटनेच्या २३ कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. जंगली महाराज रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी उद्यान परिसरात १५ फेब्रुवारीला एका संघटनेकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात आणले आणि नोटीस देऊन सोडून दिले. या प्रकरणी पोलीस हवालदार नलिन येरुणकर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यानात पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संबंधित संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनास अनुमती नाकारण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.

संपादकीय भूमिका

  • केवळ गुन्हा नोंदवून न थांबता हे कुणाच्या जोरावर आंदोलन करत आहेत, हे पाहून सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • पोलिसांच्या अनुमतीविना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन होते, यातून पोलिसांचा आंदोलकांवर कोणताच वचक नाही, असेच म्हणावे लागेल. यांना वेळीच न खडसावल्यास हेच आंदोलनकर्ते उद्या देशात आतंकवादी कारवाया करायलाही मागे-पुढे पहाणार नाहीत, असे कुणी म्हटल्यास चुकले कुठे !