(रील्स म्हणजे छोटा व्हिडिओ, जो इन्स्टाग्रामवर प्रसारित केला जातो.)

रायचुरू (कर्नाटक) – शहरात राष्ट्रध्वज आणि भगवद्गीता यांवर पाय ठेवून त्याचे ‘रील्स’ बनवणार्या २ धर्मांध मुसलमान तरुणांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. नवाझ आणि सोहेल नावाच्या या २ मुसलमान तरुणांनी राष्ट्रध्वज आणि हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता यांवर पाय ठेवून ‘रील्स’ बनवले आणि ते ‘व्हॉट्सॅप स्टेटस’वर (इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्रण.) ठेवले होते. राष्ट्राचा आणि हिंदु धर्माचा अवमान केल्याच्या या प्रकारामुळे रायचुरू जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अनेक हिंदु संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
या आक्षेपार्ह ‘व्हॉट्सॅप स्टेटस’च्या विरोधात राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्तिक रेड्डी यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली होती. पोलिसांनी व्हॉट्सॅप स्टेटस ठेवणार्या आरोपींचा शोध घेतला आणि २४ तासांच्या आत नवाझ आणि सोहेल यांना अटक केली. ‘या प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई केली जाईल’, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाही राष्ट्रद्वेषी आणि धर्मद्वेषी मानसिकता मुळासकट नष्ट करण्यासाठी अशा आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !