अद्वैताचा अनुभव

प्रतीकात्मक चित्र

१. ‘अद्वैताचे तत्त्वज्ञान’ हे सामान्य माणसाच्या विचाराच्या पलीकडील स्तरावरचे आहे. ते मान्यता पावण्यास अनेक जन्म जायला लागतील.

२. अद्वैताची संकल्पना सहजपणे मांडणे अशक्यच आहे; कारण त्याचे स्वरूप वस्तू रूपाने वर्णनातीत आणि शब्दातीत, मानसिक अन् कल्पनातीत आहे; पण तो एक अनुभव, अनुभूती या सार्‍यांच्या पलीकडेच आहे. मला जर गोडी म्हणजे काय, हे ठाऊक नसेल, तर आपण केवळ वर्णन करून ‘गोड चव म्हणजे काय ?’, हे समजावून देऊ शकाल काय ?

३. अद्वैत संकल्पना शब्दातीत आहे; कारण ती मानसिक स्तरावर किंवा पंचेंद्रिये स्तराच्या पलीकडील असून ते अनुभवायचेच असते.

(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)