समस्तीपूर (बिहार) येथे हिंदु राष्ट्र-जागृती व्याख्यानाचे आयोजन

समस्तीपूर (बिहार) – अलीकडेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित जिहादी प्रकरणात छापेमारी केली. त्या वेळी त्यांनी वर्ष २०४७ पर्यंत भारताचे विभाजन करून देशात इस्लामी राज्य स्थापन करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले. लोकसंख्या विस्फोट, अनधिकृत स्थलांतर आणि धर्मांतर यांच्याद्वारे भारताची लोकसंख्या पालटण्याचे खोलवर षड्यंत्र चालू आहे. जर छद्म धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे हे तुष्टीकरण चालू राहिले, तर भारतात इस्लामी राजवट येईल. त्यामुळे हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘बनारस इस्टेट’ येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती व्याख्यानाला संबोधित करतांना व्यक्त केले.

अशाच प्रकारचे व्याख्यान ‘प्रीतिका इंटरनॅशनल हॉटेल’मध्येही आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही व्याख्यानांच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते.
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !