|
(‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ म्हणजे ‘अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ’)

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – ‘हम दो, हमारे दो डझन’ अशी घोषणा करत ए.आय.एम्.आय.एम्.चे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी मुरादाबाद येथे एका सार्वजनिक सभेत मुसलमानांना २४ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले.
🚨 Population Politics Exposed 🚨
Moradabad: AIMIM leader Shaukat Ali sparks outrage with his “Hum Do, Hamare Do Dozen” remark – calling them a “gift from Allah.”
Is this religious freedom, or irresponsible population politics at public expense?
India deserves accountability,… pic.twitter.com/pRxzeCdzKr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2026
शौकत अली यांनी केलेली विधाने –
१. मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल अनेक लोक काळजी करतात; परंतु मोठी लोकसंख्या राष्ट्राला अधिक भक्कम बनवते. चीनची मोठी लोकसंख्या ही त्याच्या जागतिक सामर्थ्याचे एक कारण आहे.
२. मुले अल्लाची देणगी आहेत आणि त्यांना न घाबरता स्वीकारले पाहिजे. जोपर्यंत अल्ला देत आहे तोपर्यंत लोकांनी मुले जन्माला घालत रहावीत. वाढत्या लोकसंख्येकडे समस्या म्हणून न पहाता त्याकडे शक्तीचे लक्षण म्हणून पाहिले पाहिजे.
३. मला ८ मुले आहेत. माझ्या मोठ्या भावाचे निधन झाले आहे, त्यांना १६ मुले आहेत. माझी आई ९७ वर्षांची आहे आणि तिला ७२ नातवंडे आहेत, त्यांपैकी बरेच तरुण आणि उंच आहेत.
हिंदूंनी १४ मुले जन्माला घालावीत !
स्वतः लग्न न केलेले काही हिंदु नेते इतर हिंदूंना ४ मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. चारच का? आम्ही आमच्या हिंदु बांधवांना १४ मुले जन्माला घालण्यास सांगतो; कारण त्यामुळे देश भक्कम होण्यास साहाय्य होईल; पण इतरांना सल्ला देणार्या नेत्यांनी आधी स्वतः लग्न करून मुले जन्माला घालावीत.
(म्हणे) ‘काँग्रेस काळातील दंगलींमध्ये २ लाख २५ सहस्र मुसलमानांची हत्या !’
काँग्रेस सरकारच्या काळात अनुमाने ५० सहस्र दंगलींपैकी जवळजवळ ९० टक्के मुसलमान बळी पडले होते. स्वातंत्र्यानंतर सुमारे २ लाख २५ सहस्र मुसलमान मारले गेले. (शौकत अली चुकून मुसलमान म्हणत आहेत, असेच म्हणावे लागेल; कारण दंगली मुसलमान चालू करतात आणि हिंदूंना मारले जाते, हेच फाळणीपासून चालू आहे ! – संपादक) या तथ्यांकडे न्याय आणि प्रशासन याविषयी बोलणार्यांनी पाहिले पाहिजे. (खोटे बोला; पण रेटून बोला वृत्तीचे शौकत अली ! – संपादक)
समाजवादी पक्षाचा नेता मद्य व्यावसायाशी जोडलेला !
माजी कॅबिनेट मंत्री आणि समाजवादी पक्षाचे आमदार कमल अख्तर मुरादाबादमध्ये मद्य विक्रीत सहभागी होते. ‘गझल बार’सारख्या जागा कोण चालवते हे अनेकांना ठाऊक आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वतः मद्य व्यवसायाशी जोडलेले आहेत, तरीही ते आमच्या पक्षावर भाजपचा ‘ब गट’ असल्याचा आरोप करतात.
(म्हणे) ‘मुसलमानांमध्ये भीती वाढली !’
गेल्या काही वर्षांत शेकडो मदरशांचा विस्तार झाला आहे; परंतु त्यांना ‘आतंकवादाचे केंद्र’ म्हणून ओळखले जात आहे. मुरादाबाद जिल्ह्यात सुमारे १०० मदरसे बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे समुदायात भीती वाढली आहे. मुसलमानांना आता रेल्वे किंवा बस यांद्वारे प्रवास करतांनाही असुरक्षित वाटते. सार्वजनिक ठिकाणी दाढी ओढली जाते. मुसलमान मुलींना सार्वजनिक छळाला सामोरे जावे लागत आहे, ज्यामध्ये त्यांचे हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) बलपूर्वक काढून टाकण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. (या देशात लव्ह जिहाद, लँड जिहाद, थुंकी जिहाद, आतंकवाद, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीजवळ आक्रमण, काश्मीरमध्ये अद्यापही हिंदू रहायला जाऊ शकत नाही, ही सर्व उदाहरणे मुसलमान नाही, तर हिंदूंना भीती असल्याची आहेत. असे असतांना चोराच्या उलट्या बोंबा मारल्या जात आहेत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकेंद्र आणि अनेक राज्य सरकारे मुसलमानांवर सरकारी योजनांद्वारे पैसे उधळत असल्याने, सर्व सरकारी सोयीसुविधा यांचा पुरेपुर लाभ घेत असल्याने, तसेच मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याचा कोणताही अट्टहास नसल्याने अनेक मुले जन्माला घालणे मुसलमानांसाठी कठीण नाही. मोठे झाल्यावर ते गुन्हेगारी कृत्यामध्येच अधिक सापडतात, असेही दिसून येत असल्याने पोसण्याचा, संस्कार करण्याचाही भार नसतो, हीसुद्ध वस्तूस्थिती आहे ! |
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !