
मुंबई – पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे. विदेशी भाषांचा वापर टाळावा. मुलांशी घरी मातृभाषेतून संभाषण करावे. मातृभाषेचा वापर वाढला पाहिजे. ‘मम्मी-डॅडी’ म्हणण्यापेक्षा आई-वडील असेच म्हटले पाहिजे, असे मत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. येथील वरळी डोम येथे चालू असलेल्या २ दिवसीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, राज्यघटना यांवर आधारित नागरी कर्तव्यांचे पालन करा !
या वेळी प.पू. सरसंघचालक म्हणाले की, संघाला जाणून घ्यायचे असेल, तर संघ शाखांचा अनुभव घ्यावा. संघाची शाखा, कार्यकर्ते, शिबिरे आदींचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास संघ यथार्थ समजेल. कितीही आरोप अथवा टीका झाली, तरी संघाचे काम सतत चालू असते. संघाला प्रसिद्धीचा सोस नाही. सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, राज्यघटना यांवर आधारित नागरी कर्तव्यांचे पालन यांवर भर द्या.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !