
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चंद्र सेन यांचा दिनाजपूर जिल्हा कारागृहात मृत्यू झाला. ८३ वर्षांचे रमेश चंद्र सेन हे शेख हसीना यांचे निकटवर्तीय मानले जात होते आणि त्यांच्या सत्तेच्या समाप्तीनंतर ते कारागृहात होते. कारागृह प्रशासनानुसार ७ फेब्रुवारीला सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना दिनाजपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सकाळी साधारण ९.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिनाजपूर कारागृह अधीक्षक फरहाद सरकार यांनी सांगितले की, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल.
Ramesh Chandra Sen, a veteran Hindu leader of the Awami League, has passed away in prison. 🚩
The Awami League blames a lack of proper medical care.
With 107 custodial deaths reported in 2025, questions regarding prisoner safety are rising. ⚠️
#CustodialDeath… https://t.co/yQ5gqX7ajy pic.twitter.com/GVjEsQ5jAG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2026
कारागृहात योग्य उपचार मिळाले नसल्यानेच मृत्यू ! – अवामी लीगचा आरोप
अवामी लीगचे केंद्रीय संघटन सचिव शफिउल आलम चौधरी नादेल यांनी आरोप केला की, रमेश चंद्र सेन ५ वेळा संसद सदस्य राहिले असून माजी मंत्रीही होते. आजारी आणि वृद्ध असतांनाही त्यांना साखळ्या घालून अटक करण्यात आली. कारागृहात त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी या मृत्यूविषयी अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्याकडे उत्तर मागितले.
बांगलादेश छात्र लीगचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनीही गंभीर आरोप केले. कोणतेही ठोस आरोप नसतांना त्यांना कारागृहात ठेवण्यात आले. जामीन नाकारण्यात आला. किमान वैद्यकीय सुविधा किंवा मूलभूत मानवी हक्कही देण्यात आले नाहीत. दीड वर्षे खटला न चालवता कारागृहात ठेवल्यामुळे त्यांची प्रकृती सतत ढासळत गेली, असे त्यांनी म्हटले.
वर्ष २०२५ मध्ये पोलीस कोठडीत १०७ जणांचा मृत्यू
मानवी हक्क संघटना ऐन्.ओ. सालिश केंद्राच्या माहितीनुसार बांगलादेशात वर्ष २०२५ मध्ये कोठडीत १०७ जणांचा मृत्यू झाला. यांपैकी बहुतांश अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते होते. बहुतांश प्रकरणांत मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका किंवा अचानक आजार असे नमूद करण्यात आले; मात्र कोणत्याही प्रकरणाची सखोल चौकशी झालेली नाही, असा दावाही करण्यात आला.
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif