पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली माहिती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – टी-२० क्रिकेट विश्वचषकाविषयी आम्ही एक स्पष्ट पाऊल उचलले आहे की, आम्ही भारताविरुद्ध सामना खेळणार नाही; कारण क्रीडा क्षेत्रात कोणतेही राजकारण नसावे. आम्ही काळजीपूर्वक विचार करून ही भूमिका घेतली आहे आणि आपल्याला बांगलादेशाच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहिले पाहिजे. मला वाटते की, हा एक अतिशय योग्य निर्णय आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगितले. टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ फेब्रुवारीला होणार होता; पण पाकने हा सामना खेळण्यास नकार दिला असून पंतप्रधान शरीफ यांनी त्याला अधिकृत दुजोरा वरील विधानातून दिला आहे.
Good riddance.
Pakistan PM Shehbaz Sharif says Pakistan won’t play India in the T20 World Cup to “support” Bangladesh.
Indians have long said India should stop playing cricket with Pakistan anyway.
If Pakistan is stepping back on its own, that’s a win – and it should stay that… pic.twitter.com/cCnwnSmiEE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 5, 2026
टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश संघासमवेत एकता दर्शवण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
बांगलादेशाने त्याचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती आणि ही मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (सीसीआयने) फेटाळली होती. त्यामुळे बांगलादेशाने या स्पर्धेवर बहिष्कार घातला. बांगलादेशाला साहाय्य करण्यासाठी पाकने वरील निर्णय घेतला.
संपाकीदय भूमिकायाला म्हणतात सुंठी वाचून खोकला गेला ! पाकसमवेत भारताने कुठेही क्रिकेट खेळू नये, असेच भारतियांना वाटत असते, तरीही भारत खेळतो, हे चुकीचेच आहे. आता पाकच खेळणार नसेल, तर ते चांगलेच म्हणावे लागेल ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !