अपेक्षित अर्थसंकल्प !

येत्या वर्षभरात निवडणुका नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देणे, मतदारांना स्वप्ने दाखवणे आणि जनतेला खुश करण्याची आवश्यकता नाही. याची पुरेपूर जाण असणारा अर्थसंकल्प ! धोरणात्मक आणि रचनात्मक दृष्टीकोनातून मांडलेला आणि भान असणारा, असा हा अर्थसंकल्प !

श्री. श्रीनिवास वैद्य

१ एप्रिल २०२६ पासून ‘नवा आयकर कायदा २०२५’ लागू होणार असल्यामुळे आयकराचे दर आणि त्या कायद्यात फार मोठे पालट अपेक्षित नव्हतेच. नवीन करप्रणाली लागू होणार असल्यामुळे आस्थापन आयकरदात्यांना मात्र काही दिलासा मिळेल, हे नक्की. आयकर विवरणपत्र भरत असतांना चूक झाली, तर ती महागात पडणार आहे. त्यामुळे आयकरदात्यांनो विवरणपत्र दायित्वाने भरा. छोट्या आणि मध्यम उत्पादकांना ‘इन्व्हॉस डिस्काऊंटींग’ची (बीजक सवलतीची) केलेली सोय पुष्कळ मोठा दिलासा देणारी आहे. समभाग विक्री बाजारामध्ये (‘शेअर मार्केट’मध्ये) ‘फ्युचर्स’ आणि ‘ऑप्शन्स’ यांच्या व्यवहारावर अतिरिक्त कर लावला, ते चांगले झाले. यामुळे भांडवली बाजारातील सूज न्यून झाली, तर आनंदच आहे. अल्प, मध्यम तथा दीर्घकालीन गुंतवणूकदार यांची हानी होणार नाही. अपेक्षित असाच हा अर्थसंकल्प आहे.

(१.२.२०२६)

– श्री. श्रीनिवास माधवराव वैद्य, सनदी लेखापाल, सोलापूर