कुत्र्यांच्या आक्रमणात चिमुकल्याचा मृत्यू !

कर्जत (जिल्हा रायगड) – येथील ऋषिकेश पवार (वय ९ वर्षे) रस्त्यावरून चालत असतांना कुत्र्यांनी त्याच्यावर आक्रमण केले. नागरिकांनी त्याला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले; पण यात ऋषिकेश गंभीर घायाळ झाला. त्याला रुग्णालयात भरती केले; पण त्याचा मृत्यू झाला.
लोकलखाली येऊन विवाहितेचा मृत्यू !

बदलापूर – लोकल पकडत असतांना तोल जाऊन धावत्या लोकलखाली पडल्याने चेतना देवरूखकर (वय २८ वर्षे) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या २२ सभा रहित !
मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आयोजित केलेल्या २२ जाहीर सभा रहित करण्याचा निर्णय घेतला. या सभा ७ दिवसांत घेण्यात येणार होणार होत्या.
नवी मुंबई विमानतळ २४ घंटे चालू रहाणार !

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळ २५ डिसेंबरपासून प्रवाशांसाठी चालू करण्यात आले आहे. सध्या विमानतळ फक्त १२ घंट्यांसाठी कार्यान्वित होते; पण १ फेब्रुवारीपासून ते २४ घंटे चालू रहाणार आहे. यामुळे विमानतळावरील उड्डाणांची संख्या लवकरच वाढेल. सध्या विमानतळावरील शेवटचे विमान रात्री ९.५० वाजता उड्डाण घेईल, तर पहिले उड्डाण सकाळी ७.१० वाजता होईल. एप्रिल महिन्यापर्यंत विमानांची संख्या २० होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या १०२ नगरसेवकांकडून पक्षाने घेतले हमीपत्र !
नागपूर – भाजपने येथील १०२ पक्षाच्या नगरसेवकांकडून हमीपत्र घेतले आहे. यात प्रामुख्याने ४ सूत्रे आहेत. नगरसेवकांकडून सामाजिक सलोखा बिघडणारे वक्तव्य झाल्यास, त्याचे कुठल्या घोटाळ्यात नाव आल्यास, जातीत तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यास किंवा त्यांचा अनुचित प्रकारात सहभाग आढळल्यास त्यागपत्र देण्याचे हमीपत्र घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका : सर्वच पक्षांनी नगरसेवकांकडून असे हमीपत्र घेणे आणि त्यानुसार कारवाई करणेही अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद