क्रांतीगाथा प्रदर्शनातून तरुण पिढीमध्ये देशभक्ती निर्माण होईल ! – प्रदर्शनार्थींचा अभिप्राय

चिपळूण – देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतीकारकांच्या बलीदानातून मिळालेले आहे. त्यांनी राष्ट्रासाठी केलेला त्याग तरुण पिढीपर्यंत पोचावा. त्यातून देशभक्तीची पिढी सिद्ध व्हावी, या उद्देशाने ‘हिंदु जनजागृती समितीच्या’ वतीने क्रांतीगाथा प्रदर्शन लावण्यात येते. याच उद्देशाने तालुक्यातील कामथे येथील मा. बाळासाहेब माटे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात २६ जानेवारी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’ लावण्यात आले होते.
हे प्रदर्शन पाहिल्यानंतर अनेक जिज्ञासूंनी अभिप्राय देतांना म्हटले आहे, ‘विद्यार्थी, तसेच युवकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती राष्ट्रधर्माचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे हे क्रांतीकारकांचे प्रदर्शन आहे. क्रांतीगाथा प्रदर्शनातून विद्यार्थी, तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्ती निश्चित निर्माण होईल.’
आजच्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांच्या समवेत संस्थाचालक, शिक्षक-कर्मचारी वृंद, ग्रामस्थ यांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रदर्शन आयोजनात साधक श्री. विनायक कांगणे यांच्यासह संस्थेचे शिक्षक-कर्मचारी वृंदानी चांगले सहकार्य केले.

मनोगत१. डॉ. विजय बाळासाहेब माटे, संस्था अध्यक्ष – समिती चांगले कार्य करत आहे. क्रांतिकारकांचे प्रदर्शन काहीतरी कार्य करण्यास प्रोत्साहन देणारे आहे. २. श्री. प्रदीप ठसाळे, शिक्षक – हे प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती मूल्ये रुजवण्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रदर्शनातून मला कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. ३. श्री अरुण नटे आणि एस्.एस्. थोरवडे, शिक्षक – समितीचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ४. श्री दशरथ खेडेकर, ग्रामस्थ – तरुणांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने आपण चांगले कार्य करत आहात. ५. श्री मनोज खेडेकर आणि प्रवीण खेडेकर – प्रदर्शन नवीन पिढीला प्रेरणा देणारे ! |
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !