एका कार्यक्रमात ‘कार्तिगई दीपम्’सारखा दीप प्रज्वलित करतांना मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांचे मिश्किल विधान !

चेन्नई (तमिळनाडू) – येथे २४ जानेवारी या दिवशी ‘धारा डिवाइन अवॉर्ड्स’ कार्यक्रमाचा प्रारंभ मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर्. स्वामीनाथन् यांनी दीप प्रज्वलित करून केला. न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांनी यापूर्वी राज्यातील तिरुप्परनकुंड्रम् टेकडीवरील दगडी स्तंभावर ‘कार्तिगई दीपम्’ प्रज्वलित करण्यास अनुमती दिली होती. कार्यक्रमात त्यांनी जो दीप लावला होता, तो त्याच पद्धतीचा बनवण्यात आला होता. यावरून न्यायमूर्ती स्वामीनाथन् विनोदाने म्हणाले की, मी योग्य दीप लावत आहे ना ? कि हा सर्वेक्षणासाठीचा दगड आहे ? माझ्या सेवाकाळातील साडेचार वर्षे अजून शेष आहेत आणि त्या कालावधीपूर्वी माझे निलंबन होऊ नये. आजचा कार्यक्रम सनातन धर्म अधिक बळकट होण्याची आशा देतो, असेही त्यांनी नमूद केले.
तिरुप्परनकुंड्रम् मंदिरात दीप प्रज्वलनास दिलेल्या निर्णयामुळे न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांना राज्यातील सत्ताधारी द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) पक्षाकडून टीकेला सामोरे जावे लागले होते.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री