जिज्ञासूंनी घेतला देशी गाय आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे यांमधील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव !

जोधपूर (राजस्थान) – ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशन २०२६’च्या भव्य प्रदर्शनात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने सादर केलेले आध्यात्मिक संशोधन आणि प्रदर्शन यांनी उपस्थित जिज्ञासूंचे लक्ष वेधून घेतले. विश्वविद्यालयाने अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय दाखवत चलचित्रे, दूरचित्रवाहिनीचे प्रसारण आणि आधुनिक वैज्ञानिक उपकरणे यांच्या साहाय्याने संस्कृती आणि हिंदुधर्म यांची माहिती अत्यंत प्रभावीपणे सादर केली.
या सादरीकणाचे वैशिष्ट्य, म्हणजे स्वदेशी गाय, अयोध्येतील श्रीराममंदिर आणि उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर यांच्याशी संबंधित आध्यात्मिक ऊर्जा वैज्ञानिक उपकरणांनी मोजून उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. या वेळी अन्य प्राण्यांहून मूळ भारतीय गायींमध्ये असलेली अधिक सकारात्मक आणि सात्त्विक ऊर्जा, श्रीराममंदिराच्या अभिषेकाच्या वेळी वातावरणात निर्माण झालेले व्यापक सकारात्मक पालट अन् महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या उच्च ऊर्जेच्या पातळीमुळे भाविकांना होणारे मानसिक, शारीरिक, तसेच आध्यात्मिक लाभ या सर्व गोष्टी वैज्ञानिक परीक्षण आणि यंत्रांच्या आधारे समजावून सांगण्यात आले. हा अभिनव प्रयोग, म्हणजे आध्यात्मिक अनुभवांना प्रत्यक्ष पुराव्यांशी जोडण्याचा एक अनोखा प्रयत्न होता.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साक्षी जैन आणि अन्य सदस्य यांनी उपस्थितांना या संशोधनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनस्थळी अध्यात्म, सनातन धर्म आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील सखोल संबंधांविषयी माहिती दिली, ज्यामुळे अनेक प्रतिष्ठित मान्यवर प्रभावित झाले. या प्रदर्शनासाठी ‘अखिल भारतीय माहेश्वरी महासभे’चे सभापती आणि जागतिक अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. संदीप काबरा अन् सरचिटणीस श्री. अजय काबरा यांचे सहकार्य मिळाले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या या प्रयत्नाचे सर्वांनी कौतुक केले आणि सनातन संस्कृतीची ही वैज्ञानिक ओळख जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे उद्गार काढले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !