मुसलमानांनी केले नमाजपठण
धार (मध्यप्रदेश) : येथील भोजशाळेत २३ जानेवारीला वसंतपंचमीनिमित्त सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात आली; मात्र दुपारी १२ ते दुपारी ३.३० या वेळेत मुसलमानांना नमाजपठणासाठी पूजा स्थगित करण्यात आली होती. दिवसभरात दोन्ही धर्मियांकडून शांततेच धार्मिक कृती करण्यात आल्या. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी येथे मिरवणूकही काढण्यात आली होती. यात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते.
Bhojshala Update🕉️📜
Vasant Panchami Puja & Darshan concluded peacefully at Bhojshala; Namaz was also offered as per the Supreme Court directions
It’s widely known that Bhojshala is a Hindu site. Hindus seek an expedited court hearing on the ASI survey ordered by the court, so… https://t.co/R3RoyW6K5p pic.twitter.com/swC0gAKyXI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2026
भोजशाला परिसरातील कमल मौला मशिदीत न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या वेळेत मुसलमानांना प्रशासनाने वज्र वाहनाच्या माध्यमातून आणले होते. अनुमाने २० मिनिटे नमाज झाल्यानंतर सर्व मुसलमानांना परत नेण्यात आले. मशिदीचा भाग तंबू लावून झाकण्यात आला होता. मुसलमानांना वेगळ्या मार्गाने आणि प्रवेशद्वाराने येथे आणण्यात आले होते.
हे ही वाचा → SC Verdict Bhojshala : मुसलमानांना दुपारी १ ते ३ वेळेत नमाजपठणासाठी अनुमती !
गर्दीमुळे वृद्ध भाविक बेशुद्ध
भोजशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांची मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्त आल्याने परिसरात गर्दीचे वातावरण होते. याच वेळी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध भाविकाची अचानक प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध पडले. उपस्थित प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्या साहाय्याने येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक उपचार दिले. उपचारानंतर त्या भाविकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाभोजशाळा हिंदूंची आहे, हे जगजाहीर आहे. पुरातत्व विभागाने न्यायालयाच्या आदेशाने केलेल्या सर्वेक्षणावर लवकरात लवकर सुनावणी होऊन भोजशाळा हिंदूंना मिळून ही समस्या कायमची संपवण्यात यावी, असेच हिंदूंना वाटते ! |

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र