अलिबाग (रायगड) येथे २२ जानेवारी ते २६ जानेवारी या काळात राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन !

१९ राज्यांतील ६५० नेमबाज सहभागी होणार !

अलिबाग (रायगड) – येथील आर्.सी.एफ्. स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे २२ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील १९ राज्यांतील ६५० नेमबाजांनी सहभाग नोंदवला आहे.

१०, १४ आणि १९ वर्षांखालील प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक २५ सहस्र, द्वितीय पारितोषिक १५ सहस्र रुपये आणि तृतीय पारितोषिक १० सहस्र रुपये असणार आहे, तर वरिष्ठ गटासाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० सहस्र रुपये अन् तृतीय पारितोषिक २५ सहस्र रुपये असेल.