
मुंबई – महाराष्ट्र सरकारचे कृषी विभाग आणि एम्.एस्. स्वामीनाथन् रिसर्च फाऊंडेशन (एम्.एस्.एस्.आर्.एफ्.) यांनी महिला सक्षमीकरण, संसाधन हक्क, पोषण सुरक्षा, लिंग न्याय, पर्यावरणीय शाश्वतता आणि शेतकरी समृद्धी मजबूत करण्यासाठी साहाय्य करणारे व्यापक धोरण सिद्ध करणे अन् अंमलबजावणी कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी संयुक्तपणे सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत शेतकरी महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत विषयावर २३ जानेवारी या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य कृषीमंत्री अधिवक्ता आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे सभागृह क्रमांक ४ मध्ये होणार आहे.
या चर्चासत्राला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, एम्.एस्. स्वामीनाथन् रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन्, कुमारीबाई, द्वारकाताई, सल्लागार समितीचे डॉ. गोविंद केळकर, सीमा कुलकर्णी, फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. आर्. रेंगलक्ष्मी, श्रीमती मीरा सौदरराजन यांची व्याख्याने होणार आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !