सातारा येथे २६ जानेवारीला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

संतोष पाटील, जिल्हाधिकारी

सातारा, २० जानेवारी (वार्ता.) – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी या दिवशी सकाळी ९.१५ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘राष्ट्रध्वजारोहणानंतर पथसंचलन आणि शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अधिकच्या स्थानिक बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. २६ जानेवारीला सकाळी ८.३० ते १० ही वेळ सोडून शासकीय, अशासकीय कार्यालयांनी किंवा संस्थांनी आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम करावा.’’