वेताळ देवस्थानाच्या विटंबनेचे प्रकरण

खोपोली (जिल्हा रायगड) – येथील लव्हेज गावातील वेताळ देवस्थानाच्या विटंबनेच्या प्रकरणी पालिका प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली. गावातील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेत आंदोलन करण्याचे ठरवले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. येथे गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळ वेताळ देवस्थान आहे. या ठिकाणी ग्रामस्थांकडून नियमित त्याची पूजा केली जात होती; मात्र येथील एका ठेकेदाराने रात्रीच्या वेळी हे देवस्थान अंशतः हलवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
🚨 Khopoli (Raigad): Villagers Warn of Protest Over Official Inaction! 🚨
In the Vetal Devasthan desecration case, anger is rising as the administration and police remain inactive. Villagers have now warned of agitation.
⚠️ Shameful that in Hindu-majority Maharashtra, Hindus… https://t.co/0rYGY2RbYo pic.twitter.com/LYW3aeHXbR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2026
या प्रकरणी ग्रामस्थांनी मोर्चाही काढला होता. तेव्हा नगराध्यक्ष कुलदीप शेटे यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र याविषयी ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. (नगराध्यक्षांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) पोलीसही टाळाटाळ करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद