देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंची उपस्थिती

देहली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या संपर्कात आलेल्या जिज्ञासू सौ. नीतू सिंह मलिक यांनी व्हॅलेंटाईन कोण होता?, व्हॅलेंटाईन साजरा करण्यामागील अर्थकारण आदींविषयी माहिती दिली. समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला भारतातून हद्दपार करण्यासाठी आपण काय करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जनजागृती करणारी चित्रफित दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साक्षी चढ्ढा यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !