राज्यात मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचाराच्या २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद !

वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ या ३ वर्षांत राज्यात घडलेल्या अशा घटनांचा आलेख सतत वाढता असून मागील ३ वर्षांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार २१ सहस्र ३८७ गुन्ह्यांची नोंद पोलिसांत झाली आहे.

नवीन शैक्षणिक धोरण जूनपासून राबवणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

राज्यात जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार !

यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील

नांदेड येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नांदेड येथील श्रीरामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत प.पू. कालीचरण महाराजांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपिठात जनहित याचिका !

दर्शन कॉलनी येथील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची अनुमती नाकारावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

प्रशासनाने रत्नागिरी बसस्थानकावरील खड्डे बुजवले, प्रवेशद्वारावरील सांडपाण्याचीही लावली योग्य विल्हेवाट !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम ! यापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील !

बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

गेल्या वर्षापेक्षा यावर्षीचे आंबा उत्पादन केवळ १२ ते १५ टक्के असल्याचे कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सांगितले आहे. तसा अहवाल त्यांनी तात्काळ शासनाकडे सादर करावा.

लोटे येथे ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या कालावधीत गोशाळेतील ६ गायींचा मृत्यू

गायींच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या गोशाळेतील गायींवर उपासमारीची वेळ आली आहे. गोशाळेचे रखडलेले अनुदान मिळावे, गोशाळेसाठी एम्.आय.डी.सी. विभागाकडून भाडेतत्त्वावर भूमी मिळावी, हे उपोषण चालू आहे.

कुपोषणावरील उपाययोजनांचा अहवाल राज्यपाल कार्यालयात ६ वर्षांपासून धूळ खात पडून !

राज्यात सर्व यंत्रणा हाताशी असूनही आणि प्रतिवर्षी आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये व्यय होऊनही कुपोषणाची समस्या न सुटणे प्रशासनाला लज्जास्पद !

श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानकच नाही !

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुसज्ज अशी बसस्थानके आहेत; मात्र श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानक नसल्यामुळे प्रवासी, भाविक, महिला आणि बालके यांना रस्त्यावरच एस्.टी.च्या गाडीची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागते.