परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

जनतेला साधना शिकवणेच आवश्यक !

जनतेला साधना शिकवणेच आवश्यक !

‘निर्गुण ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते.

हास्यास्पद साम्यवाद !

हास्यास्पद साम्यवाद !

‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-नावडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

साधनेचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधक’ या टप्प्यावर आल्यावर जिवाकडून होणारी साधना

‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर ‘साधक’ या टप्प्याला येऊन साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’

राष्ट्राची परमावधीची अधोगती !

राष्ट्राची परमावधीची अधोगती !

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक  शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आगामी हिंदु राष्ट्राचे महत्त्व !

‘आमच्या पिढीने वर्ष १९७० पर्यंत सात्त्विकता अनुभवली; पण पुढच्या पिढ्यांनी वर्ष २०१८ पर्यंत ती अल्प प्रमाणात अनुभवली आणि वर्ष २०२३ पर्यंत अनुभवणार नाहीत. त्यानंतरच्या पिढ्या हिंदु राष्ट्रात सात्त्विकता पुन्हा अनुभवतील !’

‘हिंदु राष्ट्रा’तील शिक्षणपद्धत कशी असेल ?

‘हिंदु राष्ट्रा’तील शिक्षणपद्धत कशी असेल ?

‘हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?’, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, ‘नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल….