संतांचा आत्मकेंद्रितपणा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आपल्याकडे आलेल्या जिज्ञासूला ‘त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी अनेक साधनामार्गांपैकी कोणता मार्ग आवश्यक आहे ?’, हे लक्षात घेऊन त्याला त्या मार्गातील संतांकडे एकही संत पाठवत नाहीत. याउलट सध्याचे डॉक्टर तरी बरे ! ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला कोणते उपचार आवश्यक आहेत, हे बघून हृदय, डोळे, मेंदू इत्यादी विषयातील तज्ञांकडे पाठवतात. थोडक्यात संतांच्या या वागण्यावरून ‘त्यांना स्वतःचा योगमार्ग सोडून इतर साधनामार्ग आहेत, हेही ज्ञात नसते का ?’, असा प्रश्न पडतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले