कोल्‍हापुरातील जिल्‍हा क्रीडा अधिकार्‍याला १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

भ्रष्‍टाचारग्रस्‍त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्‍याविना लाचखोरीला आळा बसणार नाही !

नांदेड प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

यापूर्वीच्‍या अनेक प्रकरणांमध्‍ये रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍यावर सरकार अन्‍वेषणाचे आदेश देते, अन्‍वेषण समित्‍या नेमल्‍या जातात; मात्र त्‍यांचे पुढे काय झाले ? किती जणांवर कारवाई झाली ? हे कधीच समोर येत नाही.

‘षोडशकारण आणि दशलक्षण महापर्वा’ची भव्‍य शोभायात्रेने सांगता !

अभूतपूर्व उत्‍साहात आणि ‘जय जिनेन्‍द्र’च्‍या जयघोषात निघालेल्‍या शोभायात्रेने गेले १६ दिवस चालू असलेल्‍या ‘दशलक्षण षोडशकारण आणि दशलक्षण’  महापर्वाची सांगता झाली.

मराठा आरक्षणासाठी हिंदु महासभेच्‍या राजेंद्र तोरस्‍कर यांचे बेमुदत उपोषण !

श्री. राजेंद्र  तोरस्‍कर म्‍हणाले, ‘‘मराठा समाजाची न्‍याय्‍य मागणी पूर्ण होईपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आहे.’’ या प्रसंगी विविध कार्यकर्ते उपस्‍थित होते.

आज ‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’च्‍या वतीने ‘हेल्‍मेट’ जनजागृती फेरी !

‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्‍हा पोलीस दल यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कोल्‍हापूर येथे ३ ऑक्‍टोबरला ‘हेल्‍मेट’ (शिरस्‍त्राण) वितरण करण्‍यात येणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता जनजागृती फेरी काढण्‍यात येणार आहे.

नागदेववाडी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘भगवा रक्षक’च्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या प्रबोधनामुळे श्री गणेशमूर्तींचे १०० टक्‍के विसर्जन !

या कृतींमुळे भाविकांना विसर्जन करण्‍यासाठी साहाय्‍य झाल्‍यामुळे श्री गणेशभक्‍तांमध्‍ये मूर्ती विसर्जन केल्‍याचा आनंद मिळाल्‍यामुळे वातावरण सकारात्‍मक झाले. ‘हे सर्व श्री गणेशाच्‍या कृपेने झाले’, असे ‘भगवा रक्षक’च्‍या कार्यकर्त्‍यांनी सांगितले.

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने गणेशोत्‍सव मंडळांच्‍या स्‍वागतप्रसंगी ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ ग्रंथ भेट !

हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने अनंतचतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्‍सव मंडळाच्‍या स्‍वागतासाठी कक्ष उभारण्‍यात आला होता. या स्‍वागत कक्षावर मंडळातील अध्‍यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शाळ, श्रीफळ आणि हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्‍ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्‍यात आला.

देयक संमतीतील दलालीप्रकरणी लाचखोर उपअभियंत्‍या सुभद्रा कांबळे यांना अटक !

प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्‍याने हे प्रकार थांबत नाहीत. त्‍यासाठी लाच मागणार्‍यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी !

निवडणुकीत महिलांना ३३ टक्‍के आरक्षण द्या ! – लोकराज्‍य जनता पक्ष

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महिलांना ३३ टक्‍के आरक्षणाचे धोरण लागू करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांना ‘लोकराज्‍य जनता पक्षा’च्‍या वतीने देण्‍यात आले.

‘गंगावेस ते पंचगंगा नदी’ हा मिरवणूक मार्ग चालू करावा ! – किशोर घाटगे, शिवसेना, उपजिल्‍हाप्रमुख

श्री. घाटगे यांनी पत्रकात म्‍हटले आहे की, २१ फुटी किंवा त्‍यापेक्षा अधिक मोठ्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करावे. प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा आणि त्‍याचसमवेत पंचगंगा घाटावर युद्धपातळीवर सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात.