‘षोडशकारण आणि दशलक्षण महापर्वा’ची भव्‍य शोभायात्रेने सांगता !

शोभायात्रेत सहभागी भाविक, श्रावक-श्राविका

कोल्‍हापूर – अभूतपूर्व उत्‍साहात आणि ‘जय जिनेन्‍द्र’च्‍या जयघोषात निघालेल्‍या शोभायात्रेने गेले १६ दिवस चालू असलेल्‍या ‘दशलक्षण षोडशकारण आणि दशलक्षण’  महापर्वाची सांगता झाली. या महापर्वात ‘प्रतिमा विद्या प्रतिष्‍ठान’ आणि ‘श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर संघ’ यांच्‍या वतीने शेंडा पार्क येथील मैदानात उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात प्रतिदिन प.पू. नियमसागर महाराज यांच्‍या अमृतवाणीतून दोन सत्रांत प्रवचन होत होते.

शोभायात्रेत सहभागी भाविक, श्रावक-श्राविका

या शोभायात्रेत शहर पंचक्रोशीसह पश्‍चिम महाराष्‍ट्र, निपाणी-बेळगावसह सहस्रो भाविक, श्रावक-श्राविका, जैन बांधव सहभागी झाले होते. शोभायात्रेत प.पू. मुनीश्री नियमसागर महाराज, पवित्रसागर महाराज, वृषभसागर महाराज, अभिनंदन सागर महाराज सहभागी होते. हा सोहळा आणि शोभयात्रा यशस्‍वी करण्‍यात अध्‍यक्ष विजय पाटील, उपाध्‍यक्ष सुरेश भोजकर, अशोक बहिरशेट, सचिन बहिरशेट, अमर मार्ले, डॉ. अनिल डोर्ले यांसह अनेक कार्यकर्त्‍यांचा सहभाग होता. प्रतिभानगर येथून निघालेल्‍या या पदयात्रेचा शहरातील विविध मार्गांवरून जाऊन महावीर गार्डन येथे समारोप झाला.