कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आणि काळजी यांच्या प्रमाणात वाढ !

समाजाला साधना शिकवून त्याची कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जायची सिद्धता करून घेणे, हाच योग्य उपाय आहे

कोरोनासह ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी २० खाटा असलेला वेगळा वॉर्ड ! – विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

बाल रुग्णांसाठी ६० खाटा असलेला अतीदक्षता विभाग बांधण्याचे काम चालू आहे.

पैठण येथे बनावट आधुनिक वैद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाचे आक्रमण !

कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.

बेंगळुरू येथे बनावट कोरोना प्रमाणपत्र देणारे २ डॉक्टर गजाआड

लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्‍या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.

सोलापूर महापालिकेच्या १५ आरोग्य केंद्रांमध्ये चालू करणार ‘औषध बँक’ !

रुग्णांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सोलापूर महापालिकेने स्तुत्य निर्णय घेतला असून अन्य महापालिकांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यावा !

किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’, तसेच अन्य साहित्य प्रदान !

किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचगंगा लसीकरण केंद्र येथील आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’ आणि ‘मास्क’ प्रदान करण्यात आले.

रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने राज्यशासनाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याविषयी निर्देश लागू केले आहेत.

मिरज येथील कोरोना रुग्णालयातील ३१ आधुनिक वैद्यांचे सातारा येथे स्थानांतर 

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शासकीय कोरोना रुग्णालयातील ३१ प्राध्यापक डॉक्टरांचे सातारा येथे नव्याने होणार्‍या वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतर करण्यात आले आहे.

म्युकरमायकोसिसवर प्रभावी असणार्‍या इंजेक्शनचा पुण्यात तुटवडा !

म्युकरमायकोसिस या आजारावर प्रभावी असणार्‍या इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. बाजारातील तुटवड्यामुळे यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगाव (कर्नाटक) येथे उद्घाटन

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उद्घाटन करण्यात आले.